spot_img

Pranit More and Malti Chahar : प्रणित मोरे आणि मालती चहरचं भांडण मिटलं?

spot_img

बिग बॉस सिझन 19 प्रचंड गाजलं. या सिझनमधील कलाकारांनी हा खेळ उत्तमरित्या खेळला. मात्र, अभिनेता गौरव खन्नाने ट्रॉफी आपल्या नावे केली. शो संपल्यानंतरही या सिझनमधील कलाकार चर्चेत आहेत. काहींची या शोमुळे मैत्रीही झाली. काहींमध्ये नातं तयार झालं. तर, काहींच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या शोमधील अनेक जोड्या प्रेक्षकांना आवडल्या. यातीलच एक जोडी प्रेक्षकांना आवडली. ती गाजलेली जोडी म्हणजे प्रणित मोरे आणि मालती चहरची जोडी. दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. दोघांनी मिळून या शोमध्ये भरपूर कल्ला केला. परंतु, शोच्या शेवटी प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात खटके उडाले. दोघांमध्ये मतभेद झाले. सध्या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघांमधील भांडण मिटले असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईमध्ये बिग बॉस सीझन 19मधील कलाकारांचे गेट-टुगेदर झाले. यावेळी या शोमधील स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांना भेटले. गौरव खन्ना, प्रणित मोरे, अशनूर कौर, आवेज दरबार यांची दुबईला जात असताना विमानतळावर भेट झाली. या ग्रुपमध्ये गप्पा टप्पा रंगल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, भेटीनंतर अशनुर आणि आवेज मिळून प्रणित मोरे आणि मालती चहरमधील भांडण दूर करण्याचा प्रयत्न करत होते. दोघांमधील भांडण सोडवून मैत्री घडवून आणत होते. याचा व्हिडिओ आवेज दरबारने शूट केला. तसेच सोशल मीडियात शेअर केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ