विमान अपघातात अजित पवार (Ajit Pawar)यांचं निधन झालं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काल म्हणजेच ३१ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना अजित पवारांकडे असलेली बहुतांशी खाती देण्यात आली आहेत. पण वित्त आणि नियोजन विभागाचं खातं अद्याप देण्यात आलं नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा चेहरा देखील अद्याप ठरला नाहीये. पक्षाची सूत्र देखील सुनेत्रा पवारांकडे दिली जातील, अशी चर्चा सुरू असतानात राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी निवड झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या एका एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला असून गोयल यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. यावर टीका केली जात असून गोयल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आधी अजित पवारांकडे होते आणि आता सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांना राष्ट्रवादीत सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल असे मला वाटत नाही, कारण त्यांनी जनतेचा विश्वास आणि मते गमावली आहेत, असंही गोयल म्हणाले.




