PM Modi Under Fire : मधु किश्वर यांचे प्रधानमंत्री मोदींवर गंभीर आरोप !

spot_img

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चिखलफेक कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांत येतोय. एका बाजूला भोंदूबाबा अशोक खरातचं धक्कादायक प्रकरण समोर येत असतानाच, दुसरीकडे राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. परंतु, हे केवळ एका पक्षापुरतं मर्यादित नाही. समाजमाध्यमांवर एक प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जातोय की, हे सर्व व्हिडिओ केवळ भाजप व्यतिरिक्त अन्य पक्षातील नेत्यांचेच का बाहेर येत आहेत? यामागे भाजपचे काही षडयंत्र आहे का? पण याच वादात आता भाजपच्याच नेत्यांविरुद्धचे काही जुने दावे, जुन्या क्लिप्स आणि गंभीर आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मग ते नितीन गडकरी असोत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असोत की अमित शाह.

गेल्या काही दिवसांपासून ‘भोंदूबाबा’ अशोक खरात याच्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. राजकारण्यांशी असलेले त्याचे संबंध आणि महिलांच्या शोषणाचे आरोप यामुळे राज्यात खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असतानाच, नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह स्वरूपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवला गेला. विरोधकांचा असा आरोप आहे की, जेव्हा जेव्हा सरकारवर किंवा भाजपवर संकट येते, तेव्हा-तेव्हा अशा पद्धतीच्या सीडी किंवा व्हिडिओंचा वापर करून लक्ष विचलित केले जाते. पण, ‘जशास तसे’ उत्तर म्हणून आता नेटकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या जुन्या प्रकरणांच्या फाईल्स उघडायला सुरुवात केली आहे.

सध्या सोशल मीडियावर भाजपची माजी कार्यकर्ती ‘बॉबी’ हिचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिने जे दावे केले आहेत, ते भाजपसाठी अत्यंत अडचणीचे ठरू शकतात. हा व्हिडिओ 2018 चा आहे. बॉबीने या व्हिडिओमध्ये थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप नेते विजय गोयल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लैंगिक शोषणाचे हे आरोप करताना तिने म्हटले आहे की, कशा प्रकारे तिला वापरून घेतले गेले आणि त्या बदल्यात तिने आपली कामे करून घेतली. त्यानंतरही तिने विशिष्ट फाईल्स पास करून घेण्यासाठी गडकरींना ब्लॅकमेल केले. हा व्हिडिओ जुना असला तरी, आताच्या राजकीय वातावरणात तो पुन्हा बाहेर येणे, हे विरोधकांकडून भाजपला घेरण्याचे एक शस्त्र ठरत आहे.

केवळ केंद्रीय मंत्री किंवा नेतेच नाही, तर देशाचे सर्वोच्च नेतृत्व म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप होत आहेत. प्रसिद्ध स्तंभलेखक मधू किश्वर, ज्या एकेकाळी मोदींच्या समर्थक मानल्या जात होत्या, त्यांनीही काही धक्कादायक दावे केले आहेत. मोदी अनेक दशकांपासून महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. मोदींनी “महिलांना पदे देण्याच्या बदल्यात” अनुचित संबंध किंवा शोषण केल्याचे मधू किश्वर यांनी म्हटले. 2014 मध्ये मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर सत्तेच्या गोटात चर्चा होत होती की, काही महिलांना खासदार किंवा मंत्री बनवण्यात आले, कारण त्यांच्याशी मोदींचे “विशेष संबंध” किंवा “विशेष सेवा” होती. त्यात स्मृती इराणी सारख्या महिलांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे आला आहे. मोदींच्या मुख्यमंत्री काळात हरदीप पुरी महिलांना “विशेष सेवा” पुरवत असल्याचा आरोप मधू किश्वर यांनी केलाय. त्यांनी हेही म्हटले की, “जर मोदींनी इतर मुद्द्यांवर चांगले काम केले असते तर मी त्यांच्या या वर्तनाकडे दुर्लक्ष केले असते”. हे आरोप त्यांनी कोणत्याही विशिष्ट पुराव्यांसह किंवा नावांसह केले नाहीत; ते “सत्तेच्या आतल्या चर्चा” आणि “वर्षानुवर्षे ऐकलेल्या गोष्टी” यांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. हे आरोप सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या काही विधानांशी जोडले जात आहेत.

भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि नेहमी स्वपक्षाला घरचा आहेर देणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी तर अनेकदा असे आरोप केले आहेत. त्यांनी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. स्वामींच्या दाव्यानुसार, मोदींचे अनेक महिलांशी संबंध आहेत. इतकेच नाही, तर स्वामींनी जाहीरपणे असेही म्हटले आहे की, भाजपमधील काही महिला नेत्यांना ‘मेरिट’ नसताना केवळ त्यांच्या शारीरिक संबंधांमुळे मंत्रिपदं देण्यात आली. स्वामींचे हे आरोप भाजपसाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत, कारण स्वामी हे स्वतः भाजपचे खासदार राहिले आहेत.

भाजपचे आजचे फायरब्रँड नेते कपिल मिश्रा, जे एकेकाळी आम आदमी पार्टीमध्ये होते, त्यांचा एक जुना व्हिडिओ आता पुन्हा चर्चेत आला आहे. दिल्ली विधानसभेत बोलताना कपिल मिश्रा यांनी प्रधानमंत्री मोदी आणि अमित शाह यांच्यावर अत्यंत गंभीर व सनसनाटी आरोप केले होते. त्यांनी अमित शाहांच्या एका कथित सेक्स सीडीचा उल्लेख केला होता. महिलांच्या शोषणावरून त्यांनी मोदी-शाहांवर टीकास्त्रही डागले होते. आज तेच कपिल मिश्रा भाजपमध्ये आहेत, त्यामुळे हा विरोधाभास नेटकरी चव्हाट्यावर आणत आहेत. मिश्रा यांनी एवढे सगळे गंभीर आरोप केल्यानंतरही भाजपने त्यांच्यावर कारवाई केली नाही, उलट त्यांना पक्षात घेऊन मोठी जबाबदारी दिली. यावरून त्यांनी त्या कथित सीडीचा वापर भाजपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केला का? असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत.

लोकशाहीमध्ये विचारांची लढाई होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या महाराष्ट्रात आणि देशात जे काही सुरू आहे, ते राजकारणाच्या अधोगतीचे लक्षण आहे. मग ते अशोक खरातचे प्रकरण असो किंवा बॉबीचे आरोप, सत्य काय आहे हे तपास यंत्रणांनी समोर आणायला हवे. केवळ सोयीनुसार व्हिडिओ व्हायरल करणे हे निरोगी समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे भाजपसोडून इतर सर्व पक्षातील नेते वाईट आहेत, असे नाही, तर भाजप नेत्यांचेही कारनामे काही कमी नाहीत, तुम्हाला भाजप नेते किरीट सोमैया आठवतच असतील!

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ