सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला 1 हजार वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi) यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक लेख शेअर केला आहे. त्यात त्यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या वैभवाबद्दल लिहीलं आहे. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रभास पाटण येथे ते असल्याचे त्यांनी नमूद केलं. सोमनाथ हे भारताच्या आत्म्याचा शाश्वत अवतार आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रममध्ये सोमनाथसह भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी लिहीलं.
कोट्यवधी लोकांची श्रद्धा आणि प्रार्थनेचं केंद्र असलेल्या सोमनाथ मंदिराला परकीय आक्रमकांनी लक्ष्य केलं, असं पीएम मोदी यांनी लिहीलं. हे धार्मिक स्थळ पूर्णपणे नष्ट करण्यावर त्यांचं संपूर्ण लक्ष होतं. 2026 हे वर्ष सोमनाथ मंदिरासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण ते या महान तीर्थक्षेत्रावरील पहिल्या हल्ला झाल्याच्या घटनेला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत, असं पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलं.जानेवारी 1026मध्ये गझनीच्या महमूदने या मंदिरावर मोठा हल्ला केला, हे मंदिर उद्ध्वस्त केलं, असं त्यांनी नमूद केलं. श्रद्धा आणि सभ्यतेचे एक महान प्रतीक नष्ट करणं हाच या क्रूर आणि हिंसक हल्ल्याचा उद्देश होता.




