spot_img

Pinki Mali : पिंकी माळीच्या वडीलांना घातपात केल्याचा संशय; काय म्हणाले ?

spot_img

बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासोबत पिंकी माळी हिचाही मृत्यू झालेला. हा अपघात नाही तर घातपातच होता, असा गंभीर आरोप पिंकी माळी हिचे वडील शिवकुमार माळी यांनी केला आहे. अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिक (पायलट) नाही तर विमानही बदलले गेले होते, असा दावा त्यांनी केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूवरून धक्कादायक दावे केले आहेत. तसेच विमान कंपनीच्या मालकाला प्रश्न विचारून कंपनीच्या कारभारावर शंका उपस्थित केली. या पत्रकार परिषदेची देशभरात चर्चा होत असताना अजित पवार यांच्यासोबत अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळी हिच्या वडिलांचे देखील अपघात नसून घातपातच असल्याचे म्हणणे आहे. यापूर्वी पिंकी माळीने चार वेळा अजित दादांबरोबर काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र पांढऱ्या रंगाचे विमान का दिले असा सवालही त्यांनी केला. वाहतूक कोंडीमुळं पायलट पोहोचू शकला नव्हता हा दावाही खोडून काढत मुंबईत सकाळी ६ वाजता कोणत्या भागात ट्राफिक असते? असा सवाल पिंकी माळीच्या वडीलांनी केला.

रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याजवळ असलेले पुरावे सगळ्यांसमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्या प्रमाणेच आम्हालाही हा घातपात असल्याचा संशय आहे, असा सनसनाटी आरोप पिंकी माळीच्या कुटुंबियांनी केलाय. अजूनपर्यंत पिंकी माळीच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही. तसंच पिंकी माळीनं अपघात होण्यापूर्वी वेगळ्या विमानातून प्रवास केला होता. पहिल्यांदाच तिनं अपघातग्रस्त विमानातून प्रवास केला होता अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिलीय. अजित पवारांचं विमान बदललं गेल्याचाही शिवकुमार माळी यांनी दावा केलाय.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ