spot_img

Phaltan Woman Doctor Dies By Suicide : फलटण पोलिस आरोपींवर बलात्कार-छळाचे गंभीर आरोप, निकमांची सखोल चौकशीची मागणी

spot_img

संपदा मुंडेंच्या दुःखद आत्महत्येनंतर आरोपी अटक, राजीव देशमुखांच्या निधनावर निकम भावुक

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे (Sampad Munde) यांनी काल रात्री हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले, यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र आणि राज्यात हादरा उडाला. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्यांनी तळहातावरच सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटेत त्यांनी फलटण पोलिस स्टेशनचे पीएसआय गोपाळ बदने (Gopal Badane) याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर (Prashant Bunkar) याच्याकडून शारीरिक-मानसिक छळ सहन केल्याचा थरारक आरोप केला आहे. या घटनेने आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणेत खळबळ माजली असून, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रशांत बनकरला त्याच्या घरी छापा टाकून अटक केली.

दुसरीकडे, पीएसआय गोपाळ बदने हे काही तास फरार राहिले, पण रात्री उशिरा त्यांनी स्वतः पोलिसांकडे हजर होऊन शरणागती पत्करली. संपदा यांच्या मागील तक्रारींनुसार, त्या गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. त्यांनी वरिष्ठांना ‘माझ्यावर अन्याय होतोय, अन्यथा मी आत्महत्या करीन’ अशी इशारा दिला होता, जो आता वास्तव झाला आहे. या घटनेमुळे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) फलटण शाखेनेही सखोल तपास आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.या संवेदनशील प्रकरणावर राज्या सभा खासदार उज्ज्वल निकम यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “एका महिला डॉक्टरला अशा परिस्थितीत हातावर सुसाईड नोट लिहावी लागते आणि जीवन संपवावे लागते, ही अक्षरशः दुर्दैवी आणि धक्कादायक बाब आहे. या प्रकरणात पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हायला हवी. फलटण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, सातारा पोलीस मुख्यालय लवकरच आरोपपत्र दाखल करेल.” त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, जे स्वागतार्ह आहे.

मात्र, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सरकारी यंत्रणेच्या जबाबदाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.या वेळी उज्ज्वल निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या अकाली निधनावरही भावूक होऊन शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “राजीव देशमुख हे माझे स्नेही अनिल देशमुख यांचे चिरंजीव होते. अल्पायुष्यात त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, ही माझ्यासाठी वैयक्तिक मोठी हानी आहे. राजीव हे जळगाव जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये ‘आझाद शत्रू’ म्हणून ओळखले जाणारे नेते होते. त्यांच्या वागण्याने, बोलण्याने आणि सामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या राजकीय-सामाजिक कामाने चाळीसगाव तालुक्यात एक वेगळी छाप पडली. त्यांच्या निधनाने कुटुंबाबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरायची शक्ती द्यो.” राजीव देशमुख हे शरद पवार गटाचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे नेते होते, ज्यांच्या निधनाने पक्ष आणि स्थानिक राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ