Petrol Diesel Crisis : गॅस टंचाईमुळे राज्यात रॉकेल वितरण सुरू; रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल

spot_img

गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत रॉकेलचे वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पुन्हा एकदा शिधापत्रिकेच्या माध्यमातून रॉकेल मिळणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, प्रत्येक कुटुंबाला दरमहा सुमारे 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. यासाठी राज्याला एकूण 37 लाख 44 हजार लिटर इतका साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये रॉकेलचे वाटप केले जाणार आहे. तसेच, केवळ शिधापत्रिका धारकांनाच नव्हे तर रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांनाही उपलब्धतेनुसार रॉकेल दिले जाणार आहे. अशा नागरिकांसाठी ग्रामपंचायतीकडून दिलेला रहिवासी दाखला पुरावा म्हणून मान्य केला जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागणार असून, घरातील जुने स्टोव्ह पुन्हा वापरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ