Perfume Tips : परफ्यूमच्या बाटलीवरील ‘ते’ तीन शब्द वाचलेत का? योग्य निवड करण्यासाठी ‘हा’ आहे सोपा मंत्र!

spot_img

EDC, EDT आणि EDP म्हणजे नेमकं काय? तुमच्या गरजेनुसार आणि ऋतूंनुसार परफेक्ट सुगंध निवडण्यासाठी या खास टिप्स नक्की वाचा

अत्तर किंवा परफ्यूम खरेदी करताना आपण सहसा फक्त त्याचा सुगंध पाहतो, पण बाटलीवर लिहिलेले EDC, EDT किंवा EDP हे कोडवर्ड तुमच्या परफ्यूमचे आयुष्य आणि तीव्रता ठरवत असतात. हे कोड्स म्हणजे बाटलीत असलेल्या सुगंधी तेलाचे (Perfume Oil) प्रमाण दर्शवतात. ज्या परफ्यूममध्ये हे तेल कमी असते, त्याचा सुगंध लवकर उडून जातो आणि ज्यात तेल जास्त असते, तो सुगंध दीर्घकाळ टिकतो. म्हणूनच, केवळ वासावरून परफ्यूम न निवडता या तांत्रिक गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.

सविस्तर सांगायचे तर, EDC (ई-डी-कोलोन) मध्ये केवळ २ ते ४ टक्के सुगंधी तेल असते, त्यामुळे याचा प्रभाव फक्त १-२ तास टिकतो; हा केवळ तात्पुरत्या फ्रेशनेससाठी उत्तम आहे. दुसरीकडे, EDT (ई-डी-टॉयलेट) मध्ये ५ ते १५ टक्के ऑईल असते, ज्याचा सुगंध ३ ते ५ तास टिकतो. ऑफिस किंवा दैनंदिन वापरासाठी हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. तर EDP (ई-डी-परफ्यूम) मध्ये १५ ते २० टक्के ऑईल असते, ज्यामुळे याचा सुगंध ८ तासांहून अधिक काळ दरवळतो. पार्टी किंवा हिवाळ्यासाठी हा ‘स्ट्रॉन्ग’ पर्याय एकदम परफेक्ट मानला जातो.

उन्हाळ्याच्या बाबतीत मात्र अनेकजण चूक करतात. घामाचा वास येऊ नये म्हणून लोक उग्र सुगंध असलेला EDP निवडतात, पण वाढत्या तापमानामुळे तो अधिक उग्र आणि डोकेदुखी देणारा ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात EDT हाच सर्वात उत्तम पर्याय आहे, कारण तो रिफ्रेशिंग असतो आणि उन्हात त्याचा वास नैसर्गिक राहतो. त्यामुळे पुढच्या वेळी परफ्यूम घेताना केवळ सुगंधावर न जाता, बाटलीवरचा हा ‘सीक्रेट कोड’ नक्की तपासा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा सुगंध निवडा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ