Parth Pawar : ‘त्या’ पत्रावरून राष्ट्रवादीत खळबळ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पार्थ पवारांनी केले आवाहन

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलीकडच्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठवलेल्या पत्रामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पत्रात कार्याध्यक्षांना राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणे अधिकार देण्याची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षात अंतर्गत मतभेद आणि ‘हायजॅक’च्या आरोपांची चर्चा पुन्हा जोर धरत असतानाच अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे.

पार्थ पवार यांनी असेही नमूद केले की, सध्या पसरत असलेल्या अनेक बातम्या या अपूर्ण माहिती आणि तर्कांवर आधारित आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेल्या नेत्यांना अशा वादात ओढणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ