Parth Pawar : पार्थ पवार यांनी घेतली खासदारकीची शपथ; अजितदादांच्या स्टाईलची झलक चर्चेत

spot_img

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडले. राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी आणि उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारले. त्याच वेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेत संधी देण्यात आली.

गुरुवारी (९ एप्रिल) पार्थ पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत औपचारिक राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात केली. या वेळी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते.

शपथविधीच्या प्रसंगी पार्थ पवार यांच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि घातलेला चष्मा हे अजित पवार यांच्या साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारे ठरले. इंग्रजीत शपथ घेताना त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये विशेष चर्चा रंगली. राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. त्या वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यानंतर ते युवा नेते म्हणून चर्चेत आले.

दरम्यान, राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली. अनेक नावांवर चर्चा सुरू असताना अखेरीस पक्षाने पार्थ पवार यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या या नव्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ