सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, तर पार्थ पवार राज्यसभेसाठी सज्ज असल्याची जोरदार चर्चा
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवान घडामोडींना सुरुवात झाली आहे. पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्यावर बीड आणि पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगम येथे भेट देत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहिली. लवकरच त्या राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय होताना दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातून आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार लवकरच दिल्लीतील राजकारणात सक्रिय होऊ शकतात.
सुनेत्रा पवार या याआधी राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यामुळे त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या कोअर टीमसह वरिष्ठ नेत्यांची याला अनुकूलता असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे पार्थ पवारांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाला अद्याप दोन वर्षे बाकी होती. तरीही पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण कार्यकाळासाठी राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पार्थ पवार यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना यश




