जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नेत्यांच्या घराणेशाहीला आता मतदारांनी चांगलाच दणका दिला आहे. नगर परिषदेत घराणेशाहीला नाकारल्याचे चित्र पाहण्यास मिळालं. तर परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतही याची झलक पाहण्यास मिळाली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या घरात ५ जणांना तिकीट मिळालं. पण ५ ही २ जण पराभूत झाले आहे. तर उरलेले ३ जणही पिछाडीवर आहे. वरपुडकरांच्या घराणेशाहीला कुटुंबाने नाकरलं आहे.
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी (Parbhani Zp Election) भाजपकडून पुन्हा एकदा घराणेशाहीला झुकतं माप देण्यात आलं होतं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर (Suresh Varpudkar) हे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पालिका निवडणुकीत वरपुडकरांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या घरामध्ये मुलगा, सून आणि पुतण्याला तिकीट देण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे गटाकडून मुलगी तर काँग्रेसकडून तिकीट घेऊन वरपुडकर यांचा पुतण्या निवडणूक लढवत आहे. पण, निकालाची मतमोजणी सुरू झाली आणि वरपुडकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
शिंगणापूर जिल्हापरिषद सर्कलमधून मुलगा समशेर वरपूडकर पराभूत झाला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे ४५० मतांनी विजयी झाले आहे. तर वरपूडकर यांची मुलगी सोनल देशमुख झरी मतदारसंघांमधून पराभूत झाली आहे. सोनल देशमुख यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवली होती. इथं भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख विजयी झाले आहे. तर कुटुंबातील पाचपैकी २ जणांचा पराभव झाला आहे. तर दोन उमेदवार देखील पिछाडीवर आहे.




