spot_img

Paparazzi Hits Back At Jaya Bachchan :  जया बच्चन यांनी पॅपाराझींवर ‘डर्टी पँट्स’ म्हणत लगावला टोमणा; संतप्त पॅप्सकडून बच्चन कुटुंबावर बहिष्काराची चेतावणी

spot_img

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर इंडस्ट्रीतील प्रमुख पॅपाराझींची तिखट प्रतिक्रिया “आम्हीही माणसंच आहोत, एवढा अपमान योग्य नाही.”

जया बच्चन (Jaya Bachchan)  आणि पॅपाराझी (Paparazzi) यांच्यातील ताणतणाव काही लपलेला नाही. पॅपाराझी दिसले की त्यांचं मूड चटकन बदलतं, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र अलीकडच्या एका कार्यक्रमात त्यांनी पॅप्सवर अशा प्रकारे टीका केली की आता पॅपाराझी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.

कार्यक्रमात बोलताना जयाजींनी पॅपाराझींसोबतचा आपला “शून्य संबंध” असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर पॅप्सना “उंदीर” आणि “घाणेरडी पँट घालणारे” अशी हीन उपमा दिली. त्यांच्या या विधानानंतर अनेक वर्षं शांत राहिलेले पॅपाराझी भडकले आहेत. त्यांनी आता बच्चन कुटुंबावरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली.

पॅप्सनी त्यांना काही गोष्टीची आठवण करून दिली दर रविवारी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बाहेर येऊन चाहत्यांना भेटतात, तेव्हा कव्हरेज आम्हीच करतो. तसेच, जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा (Agastya Nanda) येणारा चित्रपट ‘इक्कीस’ त्याचं प्रमोशन कोण करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रसिद्ध पॅप विरल भयानी यांच्या टीममधील सदस्य म्हणाले, “आम्ही कधी सेलिब्रिटींचा गैरवापर केलेला नाही. आम्हालाही आत्मसम्मान आहे.”

मानव मंगलानी यांनी सौम्य भाषेत प्रतिक्रिया देत म्हटलं की, “कदाचित जया बच्चन डिजिटल युगातल्या नाहीत. त्यांची मुलं किंवा नातवंडांनी त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्याची गरज आहे.” त्यांनी हेही निदर्शनास आणून दिलं की YouTubers आणि इंडिव्हिज्युअल क्रिएटर्सच्या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे खरी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. ते सेलेब्रिटींकडून रिअॅक्शन मिळवण्यासाठी मर्यादा ओलांडतात, जे गैरव्यवहारिक आहे.

वरिंदर चावलांनीही आपली नाराजी मांडली. त्यांनी सांगितलं की, “आम्ही रणबीर-आलियाच्या मुलांचे फोटो कधी काढले नाहीत, दीपिकाने विनंती केली तेव्हा दुआचे फोटो घेतले नाहीत. आम्ही आदर राखतो.” त्यांनी एक किस्सा सांगितला—
अमिताभ बच्चन यांनी एका चाहत्याला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ त्यांच्याकडे आला होता, पण त्यांनी तो पोस्ट न करता पीआर टीमच्या विनंतीचा मान राखला.

त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, “जया बच्चन यांनी शब्द वापरताना फरक केला पाहिजे. प्रत्येक कॅमेरामन पॅपाराझी नसतो— त्यात YouTubers, फॅन्सही असतात. सर्वांना एकाच रंगात रंगवणं योग्य नाही.” वरिंदर यांनी आपल्या टीमला सांगितलं की, “आता सेल्फ-रिस्पेक्ट महत्त्वाचा. गरज वाटल्यास जया बच्चन यांना कव्हर करणे थांबवा.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ