पंकज यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पंकज धीर (Pankaj Dhir) यांचं निधन झालं आहे. महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री त्यांचं निधन झालं आहे. पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज धीर यांनी फक्त हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं नाही तर, मराठी सिनेविश्वात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पंकज यांची प्रकृती कर्करोगामुळे अत्यंत नाजूक बनली होती आणि उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. आपल्या मित्राच्या जाण्याने फिरोज खान यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मित्राला निरोप दिला. फिरोज खान यांनी लिहिले आहे की, “अलविदा माझ्या मित्रा! आम्ही तुला खूप मिस करू.”
पंकज धीर यांनी टीव्ही आणि सिनेक्षत्रात अनेक प्रोजेक्ट्स केलेत. दरम्यान, 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या बीआर चोप्रांच्या महाभारत या मालिकेनं त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत त्यानं कर्णाची भूमिका साकारलेली. त्यानं ज्या गांभीर्यानं ही भूमिका साकारली, त्याचं उदाहरण आजही दिलं जातं. कर्णाची भूमिका साकारल्यानंतर त्यांना कर्ण म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. ‘महाभारत’ (Mahabharata) मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारल्यामुळे अनेक जण त्यांची पूजा देखील करु लागलेले. कर्नाल आणि बस्तरच्या कर्ण मंदिरांमध्ये त्यांच्या पूर्ण आकाराच्या मूर्ती स्थापित केल्या आणि त्यांची दररोज पूजा केली जायची.टीव्ही शो व्यतिरिक्त, पंकजनं चित्रपटांमध्येही काम केलं. ते चंद्रकांता आणि द ग्रेट मराठा यासारख्या अनेक पौराणिक शोचा भाग होते. त्यांनी सोल्जर, बादशाह आणि सडक यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय. पंकज धीर यांनी भारतातील पहिला अश्लील सिनेमा बनवला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचं नाव “बॉम्बे फॅन्टसी” असं होतं. पंकज धीर यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता.
पंकज धीर यांचा जन्म 1956 रोजी मुंबईत झाला. त्यांनी महाभारत, चंद्रकांता या टीव्ही मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. महाभारत या मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नागरिकांच्या मनात घर केलं. सध्या त्यांचा मुलगा निकितन धीरदेखील मालिका आणि अभिनय क्षेत्रात आहे. निकितन हा अभिनेत्री कृतिका सेंगर या अभिनेत्रीशी विवाहबंधनात अडकला.




