spot_img

PAK vs SL ODI Series : पहिल्या वनडेत विजय मिळवूनही पाकिस्तान अडचणीत; स्लो ओव्हर-रेटमुळे भरावा लागणार दंड?

spot_img

आयसीसीकडून 20% मॅच फी कपात; सुरक्षा तणावामुळे उर्वरित सामने एक दिवस पुढे ढकलले

श्रीलंका (Shri Lanka) आणि पाकिस्तान (Pakisthan) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 11 नोव्हेंबर 2025 रोजी सुरुवात झाली. पहिला सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने जिंकला असला तरी, त्याच सामन्यानंतर संघावर आयसीसीने कडक कारवाई केली. रावलपिंडीतील सामन्यात पाकिस्तानचा ओव्हर-रेट निर्धारित मर्यादेपेक्षा चार षटके कमी राहिल्याने आयसीसीने नियमांनुसार दंड ठोठावला.

मॅच रेफरी अली नक्वी यांनी स्लो ओव्हर-रेटचा आरोप सिद्ध करत पाक संघाच्या मॅच फीमधून तब्बल 20% रक्कम वसूल करण्याचा निर्णय दिला. प्रत्येक स्लो ओव्हरसाठी 5% दंड असा नियम असल्याने चार ओव्हर उशिरामुळे 20% दंड लागला. 46व्या षटकानंतर पाकिस्तानला अतिरिक्त फील्डर 30-यार्ड वर्तुळात ठेवण्याचीही शिक्षा झाली. कर्णधार शाहीन आफ्रिदी यांनी कोणतीही सुनावणी न मागता आपली चूक मान्य केली.

याचदरम्यान, इस्लामाबादमधील बॉम्बस्फोटामुळे दुसऱ्या वनडेपूर्वी तणाव निर्माण झाला. काही श्रीलंकन खेळाडूंनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानचे इंटीरियर मिनिस्टर आणि पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी यांनी खेळाडूंशी संवाद साधला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने परतणाऱ्या खेळाडूंवर कारवाईची चेतावणी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. अखेरीस दुसरा आणि तिसरा वनडे एक दिवस पुढे ढकलण्यात आला आणि सुधारित वेळापत्रकानुसार मालिका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान–श्रीलंका–झिम्बाब्वे टी20 त्रिकोणी मालिकेचे नवीन वेळापत्रकही जाहीर केले असून सर्व सामने रावलपिंडीमध्येच खेळवले जाणार आहेत.

नवीन टी20 वेळापत्रक:

18 नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे

20 नोव्हेंबर: श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे

22 नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

23 नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे

25 नोव्हेंबर: श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे

27 नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

29 नोव्हेंबर: अंतिम सामना

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ