spot_img

Paithani Saree : पैठणी खरी असते कि डुबलीकेट ? खरी पैठणी ओळखावी कशी ?

spot_img

दिवाळच्या सणा निमित्त अनेकजणी कांजीवरम, बनारसी, पैठणी सारख्या महागड्या साड्यांची खरेदी करतात. साडी खरेदी करताना महिलांची पैठणीला विशेष पसंती असते. पैठणीची किंमत किमान 20,000 रु.पासून अस्सल पैठणी मिळते. अशा वेळी एवढे पैसे देऊन विकत घेतलेली पैठणी खरोखरंच अस्सल आहे ना? डूप्लीकेट तर नाही ना? याची शहानिशा करणे आवश्यक आहे. म्हणून महिलावर्ग शक्यतो पैठणीमध्ये हात आखडता घेतात. अस्सल पैठणी आणि बनावट पैठणी कशी ओळखायची. या बददल आपण जाणून घेउयात.

अस्सल पैठणी ओळखण्याच्या काही ट्रिक्स आहेत. पैठणी 100 % शुद्ध रेशीमधाग्यापासून बनवली जाते. त्यामुळे तिला एक वेगळ्याच प्रकारची चमक असते. बनावट पैठणी राठ आणि कृत्रिम असते. अस्सल पैठणी विशेष करून मोरपंखी, नारळी, राणी, जांभळा अशा पारंपरिक रंगामध्ये मिळते. अस्सल पैठणीवर पारंपरिक डिझाइन्स जस की, मोर, कमळ आणि हंस आदी असतात. अतिशय सूक्ष्म आणि हाताने विणलेली पैठणी नेहमी उठावदार दिसते.

हातमागावर तयार केलेल्या पैठणीचे धागे पदराच्या दोन्ही बाजूंनी सारखेच दिसतात व यात धागा कुठेच कापला जात नाही. साधी पैठणी २०,००० पासून सुरु होते तर ती १०००००० लाखापर्यंत बनते. साड्यांमध्ये पैठणीला नेहमीच एक वेगळे स्थान मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ