spot_img

Padma Award : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना गौरविण्यात येणार

spot_img

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील अनेकांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांसह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

  • आर्मिडा फर्नांडिस (मुंबई) – आशियातील पहिला ब्लड बँक स्थापन करण्यासाठी मोलाचे योगदान
  • अंके गौडा- भारतातील सर्वात मोठी ग्रंथालय उभारण्याच्या कार्यासाठी.
  • भगवानदास रायकवार- बुंदेली वॉर आर्टचे प्रशिक्षक म्हणून पारंपरिक युद्धकलेचे जतन व प्रसार
  • बृजलाल भट्ट (Jammu and Kashmir)- समाजसेवा व योगशिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी
  • बुदरी ठाडी (Chhattisgarh)-नक्षलग्रस्त भागात शिक्षण पोहोचवण्याच्या कार्यासाठी.
  • चरण हेम्ब्राम (Odisha)- संथाली भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक.
  • चिरंजी लाल यादव (Uttar Pradesh)- पितळकलेत (ब्रास आर्ट) लोकांना प्रशिक्षण देऊन पारंपरिक हस्तकलेचा विकास
  • धार्मिक लाल चुन्नीलाल पांड्या- शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील योगदानासाठी
  • डॉ. कुमारस्वामी थंगराज-जेनेटिक्स (आनुवंशिक संशोधन) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी
  • डॉ. पद्मा गुरमीत (Ladakh)- सोवा-रिग्पा या पारंपरिक वैद्यक पद्धतीच्या संवर्धनासाठी
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ