spot_img

PV Sindhu In Dubai : ‘आम्ही राहत होतो तिथेच स्फोट झाला’ दुबईत अडकलेल्या पी. व्ही. सिंधूचा थरारक अनुभव

spot_img

अमेरिका आणि इस्रायल यांनी सलग दुसऱ्या दिवशीही इराणवर हवाई हल्ले सुरू ठेवले असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील नऊ देशांमधील अमेरिकन व इस्रायली लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची 1 मार्च रोजी सकाळी पुष्टी झाल्याचे वृत्त आहे.

युद्धाची तीव्रता वाढत असताना जगातील सर्वाधिक व्यस्त मानल्या जाणाऱ्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एक इराणी ड्रोन कोसळल्याची घटना घडली. यात चार जण जखमी झाले. अबू धाबी येथे एका व्यक्तीच्या मृत्यूचीही बातमी समोर आली आहे. काल बुर्ज खलिफा परिसरात झालेल्या स्फोटाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

या युद्धामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अनेक देशांनी हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. दुबईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती आहे. भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, त्या ज्या ठिकाणी थांबल्या होत्या त्याच परिसरात स्फोट झाला. त्यांच्या कोचला धूर आणि ढिगाऱ्यामुळे तातडीने तेथून हलवावे लागले, मात्र सर्वजण सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिनेत्री सोनल चौहान यांनीही मदतीची विनंती केली आहे.

दरम्यान, टाटा समूहाच्या मालकीच्या Air India ने आणखी 22 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली असून, एकूण रद्द झालेल्या उड्डाणांची संख्या 50 वर पोहोचली आहे. मुंबई-लंडन, दिल्ली-फ्रँकफर्ट, दिल्ली-झ्युरिच, दिल्ली-मिलान यांसह अनेक मार्गांवरील सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. IndiGo नेही 2 मार्च रात्री 11:59 वाजेपर्यंत काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपन्यांना 11 देशांच्या हवाई क्षेत्राचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि कुवेत यांनीही खबरदारी म्हणून आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. या सर्व घडामोडींमुळे केवळ मध्यपूर्वच नव्हे तर जागतिक पातळीवर वाहतूक आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, भारतावरही त्याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. परिस्थितीवर सर्व देश बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ