spot_img

Otur News : दुधाचा टँकर आणि पिकअपच्या अपघातात दोन महिला ठार तर २५ जखमी

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.३० डिसेंबर ( रमेश तांबे )


दुधाच्या टँकर आणि मजुरांनी भरलेल्या पिकअपचा भीषण अपघातात पिकअप मधील दोन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मंदा शिवराम हिलम वय ४० वर्षे रा. तळेगाव,ता.मुरबाड,

जि.ठाणे, वंदना गणेश हिलम वय २५ वर्षे,रा.खुटल,ता. मुरबाड,जि.ठाणे या दोन मजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी दि.३० रोजी सकळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मजुरांनी भरलेली पीक अप क्र.एम.एच.१६ सी.डी.८१५५ ही ओतूर बाजूकडून आळेफाट्याच्या दिशेने जात असताना, समोरून येणारा दुधाच्या टँकर क्र.एम. एच.१२ एक्स.एम.६१२१ यांची डुंबरवाडी येथील हॉटेल अभिजीत जवळ समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला.या अपघातात पिकअप मधील मंदा वाघ आणि वंदना वाघ या दोन महिला मजूर ठार झाल्या, तर दिपाली संदीप साबळे,शुभांगी साबळे,सोनाबाई नारायण भोईर,ढवळाबाई पोपट मुकणे,सुवर्णा दराडे,तुळसाबाई नाथा साबळे,ताईबाई दावजी हगवणे,कुसुम महेंद्र भोईर,पुष्पा नितीन वाघ,मारुती वाघ,नितीन शंकर गोडे,संगीता पांडुरंग मोडक,सुनीता छबु कोकणे,वनिता गणपत गोडे,दर्शना वाघ,योगिता हरीश भोईर, स्वाती संजय भोईर,शैला रामदास बगाड, कलाबाई महादू भोईर,छाया संताजी नाडेकर जयश्री प्रवीण बगाड,मंगल सिताराम भोईर, हसाबाई दत्तात्रय भवारी,वैशाली संतोष गोंदके, अरुणा पांडुरंग बगाड तसेच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित या दुधाच्या टँकरचा चालक संजय चव्हाण हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव,पोलीस हवालदार देविदास खेडकर,सुरेश गेंगजे,धनंजय पालवे,विलास कोंढावरे,मनोज राठोड,रोहित बोंबले,विशाल गोडसे,श्याम जायभाये,ज्योतीराम पवार यांनी अपघातस्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.तसेच अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ