spot_img

Otur News : स्विफ्ट कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२७ जानेवारी [ रमेश तांबे ]

ओतूर (Otur) जवळ स्विफ्ट कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटून,कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दि.२७ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर -कल्याण महामार्गावर ओतूर ( ता.जुन्नर ) येथील नंदलाल लॉन्स समोर घडली.

वरद अमोल तांबे (Varad Amol Tambe) वय १८ वर्षे रा.ओतूर, ता.जुन्नर,जि.पुणे, आणि श्रेयश लक्ष्मण पवळे रा पिंरगुट जि पुणे  हे दोघे ठार झाले. तर या अपघातात अभिनव गणेश वाघचौरे रा.ओतूर,ता.जुन्नर,जि.पुणे व ओंकार गोरक्ष शिंदे रा. साकुर,ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर हे दोघे गंभीर जखमी झाले असून या दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की,वरद तांबे,श्रेयस पवळे,ओंकार पवळे आणि अभीनव वाघमारे हे चौघे बुधवारी दि.२७ रोजी पहाटे अहिल्यानगर- कल्याण महामार्गानवरून ओतूर बाजूकडे येत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास,स्विफ्ट कारचालकाचा कार वरील ताबा सुटल्याने,कार रस्त्याच्या बाजला असलेल्या झाडावर जोरदार आदळून पलटी झाली. या अपघातात वरद तांबे,श्रेयस पवळे,ओंकार पवळे आणि अभीनव वाघमारे यांना गंभीर दुखापत झाल्याने,त्यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता,वरद अमोल तांबे व श्रेयश लक्ष्मण पवळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.तसेच या अपघातात अभिनव गणेश वाघचौरे व ओंकार गोरक्ष शिंदे हे गंभीर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातात स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ