ओतूर,प्रतिनिधी:दि.९ जानेवारी [ रमेश तांबे ]
दि.१९ ते २० मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विष्णु देवराम दाते रा.आणे ता.जुन्नर जि.पुणे त्यांच्या ७ व्या वेतन आयोगाचे तिसऱ्या व चौथ्या हप्त्याची १ लाख ६० हजार ३०१ रूपयांची रक्कम चुकून चिंतामण मारूती तळपे रा. केवाडी ता. जुन्नर जि.पुणे याच्या बँक खात्यावर जमा झाली होती.दरम्यान विष्णु दाते यांनी चिंतामण तळपे यांना वेळोवेळी सदरची रक्कम,ही शाळेच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत सांगीतले असता, आरोपी चिंतामण तळपे ने सदरची रक्कम बँकेच्या खात्यात जमा न करता, ती स्वतःच्या फायद्याकरीता वापरून सदरच्या रकमेचा अपहार केला होता.याबाबत विष्णु दाते यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दि.२० जून २०२५ रोजी फिर्याद दाखल केली होती.
चुकून बँक खात्यात जमा झालेली रक्कम ही स्वतःच्या फायद्याकरीता वापर करून, सदर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी, ओतूर पोलीसांनी आरोपीकडून सदरची रक्कम जप्त करून, ती मुळ मालकास परत केल्याने ओतूर पोलिसांची सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान पोलीसानी दाखल गुन्ह्याचा सखोल तपास करून,आरोपी चिंतामण तळपे यांच्याकडुन १ लाख ६० हजार ३०१ रूपयांची रक्कम जप्त करून,सदरची रक्कम दि. ८ जानेवारी २०२६ रोजी ओतूर पोलीसांनी फिर्यादी विष्णु दाते यांना परत केली असल्याने, या कौतुकास्पद कामगिरीबद्दल ओतूर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंदा भवारी, महिला पोलीस हवालदार भारती भवारी, पोलीस हवालदार विलास कोंढावळे यांनी केला आहे.




