spot_img

Otur News : ओतूरच्या उंब्रजपांध शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२८ डिसेंबर ( रमेश तांबे )

ओतूर ( ता. जुन्नर ) येथील उंब्रजपांध शिवारात रविवारी पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली.

ओतूर येथील उंब्रज पांध आणि परिसरात बिबट्याचा दैनंदिन वावर असल्याने, येथील नागरिकांनी या ठिकाणी पिंजरा लावण्यासाठी वनविभागाकडे मागणी केली होती.त्यानुसार वनविभागाने या ठिकाणी काही दिवसापूर्वी लावला होता. दरम्यान या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये रविवार दि.२८ रोजी पहाटे साडेपाच वाजता अंदाजे चार ते पाच वर्षे वयाची बिबट्याची मादी जेरबंद झाली.

बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूर वनविभागाला मिळताच,ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक किशन खरोडे,किसन केदार,गणपत केदार, रोहित लांडे,प्रदीप तांबे यांनी तात्काळ पोहोचून, वन कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने,सदर बिबट्याच्या मादीला ताब्यात घेऊन,माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ