spot_img

Otur : ओतूर जिल्हा परिषद गटातून ५७ तर पंचायत समिती गणातून ५९ टक्के मतदान

spot_img

ओतूर, प्रतिनिधी: दि.८ फेब्रुवारी  (रमेश तांबे)

जिल्हा परिषद व पंचायत सामितीच्या निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यामध्ये ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गणामध्ये शनिवारी दि.७ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

तालुक्यात एकूण ३६६ मतदान केंद्रात एकूण ६१.१८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुनील शेळके यांनी दिली.

ओतूर आणि परिसरातील सर्वच केंद्रावर सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली,दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली.मतदानाचा हक्क बजविण्यासाठी  मतदारांनी रांगा लावून, शांततेत मतदान केले.

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान 

जिल्हा परिषदेमध्ये व पंचायत समितीमध्ये कोण बाजी मारणार,कोणाला बहुमत मिळणार आणि कोणाची सत्ता येणार हे उद्या सोमवारी दि.९ रोजी निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल.

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गटात ५९ टक्के, ओतूर ५७ टक्के, आळे ५५ टक्के, राजुरी ६६ टक्के, बोरी बुद्रुक ६७ टक्के, नारायणगाव म ५४ टक्के, सावरगाव ७० टक्के व बारव येथे ५८ टक्के मतदान झाले असून व उदापूर गणात ५९ टक्के, डिंगोरे ५८ टक्के, ओतूर ५९ टक्के, धालेवाडी तर्फे व हवेली ५५ टक्के, पिंपळवंडी ५५ टक्के, आळे ५४ टक्के, राजुरी ६८ टक्के, बेल्हे ६५ टक्के, बोरी बुद्रुक ६९ टक्के, खोडद ६५ टक्के, नारायणगाव ५३ टक्के, वारूळवाडी ५६ टक्के, सावरगाव ७० टक्के, कुसूर ७० टक्के, बारव ५९ टक्के उ व तांबे गणात ५८ टक्के इतके मतदान झाले आहे. तसेच ओतूर,रोहकडी,मेंगाळवाडी येथील एकूण १३, मतदान केंद्रावर तसेच फापळेशिवार,कोळमळा,डुंबरवाडी,डोमेवाडी,

पानसरेवाडी,शेटेवाडी,खामुंडीसह एकूण १० आशा २३ केंद्रासह ओतूर जिल्हा परिषद गटात  सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकूण ५७ टक्के टक्के मतदान झाले.तर पंचायत समिती गणात ५९ टक्के मतदान झाले.

ओतूर -धालेवाडी जिल्हा परिषद गट आणि गणाकडे संपुर्ण आणे माळशेज पट्ट्याचे लक्ष लागून असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दरम्यान ही कार्यकर्त्यांची निवडणूक असली,तरीही यानिमित्ताने वर्चस्वासाठी नेत्यांची मोठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ओतूर जिल्हा गटातून परिषदेकरिता राष्ट्रवादीकडून छाया अतुल तांबे, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अक्षदा प्रसाद पानसरे,मनसेकडून प्रांजल पंकज भाटे या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

धालेवाडी तर्फे हवेली पंचायत समिती गणातून राष्ट्रदादीकडून उल्काताई बबन मोरे, शिवसेना शिंदे गटाच्या डॉ.सुनिता दौलत नायकोडी तसेच ओतूर रोहोकडी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून प्रशांत सखाराम डुंबरे,शिवसेना शिंदे गटाचे 

सचिन नामदेव घोलप या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून,मतदार राजांनी कोणात्या उमेद्वाराच्या पारड्यात जास्त मतदान टाकले आहे, हे  सोमवारी नऊ तारखेला निश्चित होईल. ओतूर परिसरातील प्रत्येक मतदान केंद्रावर ओतूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ