Numerology : अंकज्योतिषानुसार ‘कार्मिक नंबर’चे रहस्य; या तारखांना जन्मलेल्यांना भोगावे लागतात भूतकाळाचे परिणाम

spot_img

अंकज्योतिष शास्त्रानुसार जन्मतारीख केवळ व्यक्तीचा स्वभाव किंवा भविष्य सांगत नाही, तर ती पूर्वजन्मातील कर्मांचाही मागोवा देते, असा विश्वास व्यक्त केला जातो. या शास्त्रात काही विशिष्ट तारखांना ‘कार्मिक नंबर’ मानले जाते, ज्यांचा संबंध भूतकाळातील कर्मांशी जोडला जातो.

या मतानुसार, कोणत्याही महिन्याच्या 10, 13, 14, 16 आणि 19 या तारखांना जन्मलेले लोक त्यांच्या मागील जन्मातील कृतींचे परिणाम या जन्मात अनुभवतात. अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक अडचणी, संघर्ष आणि वारंवार येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.

10 तारखेला जन्मलेल्यांना नव्या गोष्टी सुरू करण्याची संधी मिळते, पण त्याचवेळी जुन्या कर्मांची पूर्तता करण्याची जबाबदारीही असते. 13 तारखेला जन्मलेल्यांमध्ये शिस्तीचा अभाव आणि आळस दिसून येतो, त्यामुळे त्यांना आयुष्यात अधिक मेहनत घ्यावी लागते.

14 तारखेला जन्मलेले लोक स्वातंत्र्याचा योग्य वापर करण्यात कमी पडतात, त्यामुळे त्यांना आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 16 तारखेला जन्मलेले लोक अहंकारी असतात, पण त्यातून नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.

तर 19 तारखेला जन्मलेल्यांसाठी स्वातंत्र्य आणि शक्तीचा योग्य वापर शिकणं महत्त्वाचं मानलं जातं. या व्यक्तींनी आत्मनिर्भरता आणि संतुलन साधणं आवश्यक असल्याचं अंकज्योतिषात सांगितलं जातं.

एकूणच, या जन्मतारखांना अशा काही समस्यांचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागतो ज्याचा यांच्या मागच्या जन्माशी संबंध असतो. 

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ