बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) भीषण अपघात (Nora Fatehi Car Accident) झाला आहे. एका दारूच्या नशेत धुंद असलेल्या व्यक्तीनं नोराच्या गाडीला येऊन धडक दिली. महत्त्वाची अपडेट म्हणजे, नोरा पूर्णपणे ठीक आहे. तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. नोराच्या गाडीला मद्यधुंद ड्रायव्हरनं समोरुन धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी रात्री नोरा फतेहीचा भीषण अपघात झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री मुंबईत डीजे डेव्हिड ग्वेटा कॉन्सर्टसाठी जात असताना एका मद्यधुंद चालकानं तिच्या गाडीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, या अपघातात नोराच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई पोलिसांनी नोरा फतेहीच्या अपघाताबाबत माहिती जाहीर केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अभिनेत्री नोरा फतेहीचा मुंबईत रस्ता अपघात झाला. एका मद्यधुंद चालकानं तिच्या गाडीला समोरुन धडक दिली. गाडीचं मोठं नुकसान झालंय मात्र, तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे तिची प्रकृती स्थिर आहे. मद्यधुंद चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.”




