spot_img

Nilesh Rane : मालवणमध्ये मोठी घडामोड! निलेश राणे निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार?

spot_img

अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय.

मालवणमध्ये (Malvan Nagarparishad Election) मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. गरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान सुरु आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदार पकडले जात आहेत. काल रात्री मालवणमध्ये पैसे वाटप करताना भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले, त्यांची वाहने जप्त करण्यात आली. मात्र त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असे सांगत शिवसेना (शिंदे) आमदार निलेश राणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. राणे यांनी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. तर निलेश राणे यांनी थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. निलेश राणे म्हणाले की, “मी चार दिवसांपूर्वी पैशांचा प्रकार पकडून दिला. त्याचा अहवाल अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आलेला नाही. त्यांनी तो पुढे पाठवलेला आहे. ते पब्लिक डॉक्युमेंट आहे, त्यात ते सर्वांना दिसायला हवे. कालच्या विषयात अजून पर्यंत एफआयआर दाखल नाही. मागच्या विषयात देखील एफआयआर दाखल नाही. उलट माझ्यावरच FIR दाखल झालेली आहे. कालच्या विषयात सकाळी पाच वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये होतो. त्याच्यावर एफआयआर झालेली नाही. जे सर्व आरोपी पकडले गेले आहेत, ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सर्व मोकाट सुटणार आणि ते सुटलेलेच आहे. ते सर्व बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. मला माहिती होतं हे असेच होणार आहे. पण, आता मी वकिलांशी बोलून या विषयात ज्या ज्या कोणत्या पार्टी आहेत, यात ज्यांचा हातभार असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचे ठरवले आहे. निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, आता माझ्याकडे पर्याय उरलेला नाही.” असे निलेश राणे म्हणाले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ