spot_img

Niagara Falls : थंडीचा कहर! जगातील सगळ्यात मोठा धबधबा गोठला

spot_img

गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी हुडहुडी आता कमी झाली असून रात्रीचा गारवा उबदारपणात बदलत आहे. मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे इतकी थंडी आहे की नायगारासारखा धबधबाही गोठला आहे. नायगारा धबधबा (Niagara Falls) हा जगातील सगळ्यात मोठ्या धबधब्यांपैकी एक. जो नैसर्गिक सौंदर्याचा अद्भुत आविष्कार मानला जातो. कितीतरी पर्यटकांचं आकर्षण स्थळ.

अमेरिका (America) आणि कॅनडाच्या सीमेवरील हा धबधबा. तीन भागांनी बनला आहे. कॅनडातील हॉर्सशू फॉल्स आणि अमेरिकेतील अमेरिकन फॉल्स आणि ब्राइडल व्हेल फॉल्स. हा धबधबा सुमारे 52 मीटर म्हणजे 170 फूटपेक्षा जास्त उंच आहे. अवाढव्य आकारमानामुळे आणि पाण्याचा प्रचंड वेगामुळे तो प्रसिद्ध आहे.अंदाजे 10-12 हजार वर्षांपूर्वी हिमनद्या वितळून तयार झालेला हा धबधबा त्याच्या प्रचंड पाण्याचा प्रवाहासाठी ओळखला जातो.पण आता थंडीत हाच धबधबा गोठला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जो पाहून कुणालाच यावर विश्वास बसत नाहीये.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ