लोकप्रिय हिंदी मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री नवीका कोटीया (Navika Kotia) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावर ‘माया’ या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेल्या नवीकाने आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात केली असून तिने बर्फात कुडकुडत्या थंडीत साखरपुडा केलाय. तिने आपल्या जोडीदारासोबतचा रोमँटिक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या शिवाय तिने इंग्लिश विंग्लिश आणि भुलभुलय्यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे .नवीका सध्या प्रदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत असून याच प्रवासादरम्यान तिला आयुष्यभर लक्षात राहील असं सरप्राईज मिळालं. बर्फाने झाकलेल्या पर्वतरांगांमध्ये आणि कुडकुडत्या थंडीत तिच्या जोडीदाराने तिला अतिशय खास पद्धतीने लग्नाची मागणी घातली. हा भावनिक क्षण नवीकाने कॅमेरात टिपला असून त्या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
या व्हिडिओमध्ये नविकाचा जोडीदार तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून बाहेर नेतो. बाहेर बर्फानं आच्छादलेला परिसर आहे. मागे हार्ट डोळे उघडताच तो गुडघ्यावर बसून तिला लग्नाची मागणी घालतो. नवीकाही लगेच हो म्हणते. हा रोमँटिक व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवीका अतिशय आनंदात दिसतेय. तिच्या हातातील एंगेजमेंट रिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्ट सोबत तिने एका छोट्याशा कॅप्शनद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयुष्यातील सुंदर सरप्राईज असा कॅप्शन तिने फोटोंना दिला आहे. आपल्या जोडीदाराची ओळख तिने सार्वजनिक केली नसली तरी पूर्वी एका इंटरव्यूमध्ये नवीकाने तिचं अरेंज मॅरेज असल्याचं सांगितलं होतं. तिच्या या पोस्टमुळे चाहतेही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. नविकाच्या साखरपुड्याच्या या फोटोंनी चाहत्यांचे मन जिंकले असून ती लग्नाची तारीख कधी जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष आहे




