spot_img

Navi Mumbai : महापे येथील लॉज मधून दोन बांगलादेशी पीडित महिलांची झाली सुटका

spot_img

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध गुन्हे शाखेने तीन आरोपीना केली अटक

विजय गायकवाड (नवी मुंबई )

नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील एमआयडीसी मध्ये दिघा ते शिरवणे या ठिकाणी पावला पावलावर लॉजिंग बोर्डिंग, बार अँड रेस्टोरंट, डान्स बार सुरु आहेत यातील अनेक लॉजिंग मध्ये अनैतिक वेश्याव्यवसाय चोरी छुपे सुरु आहेत मात्र अशाच एका चोरी छुपे व्यवसायाचा पर्दाफाश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षने महापे येथील लॉज मधून दोन पीडित महिलांची सुटका करून तीन आरोपीना अटक करण्यात आली. व हे प्रकरण उघडकिस आणले. यामुळे हॉटले लॉजिग व्यावसायिकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदाराने अशी माहिती दिली की, रबाळे (Rabale) पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापे येथील ‘ हर्षिता इन् लॉजिंग बोर्डिंग ‘प्लॉट पी. ए. पी. /A/312 चा व्यवस्थापक लॉज मध्ये येणाऱ्या ग्राहकांना त्याच्या मोबाईल मधील महिलांचे फोटो दाखवून 4500/- हजार रु. मध्ये वेश्यागमन करण्यासाठी पाठवत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने वपोनि पृथ्वी राज घोरपडे यांनी मिळालेल्या माहिती नुसार बनावट ग्राहक तयार करून महापे येथील हर्षिता इन लॉजिंग अँड बोर्डिंग येथे वेश्यागमना साठी पाठवले. त्या नुसार बनावट ग्राहकाने लॉज व्यवस्थापकास विचारले असता त्याने 4500/- रू रेट सांगितला असता बनावट ग्राहकाने पोलीस तपास पथकास सांकेतिक इशारा केला असता पोलीस पथकाने सदर लॉजवर छापा घातला व त्या ठिकाणी असलेल्या दोन बांगलादेशी पीडित महिला आढळून आल्या.

या नंतर लॉज मालक उमेश गुप्ता व्यवस्थापक अंकित पोदार व वेटर समीर मुंडा व महिला सप्लायर राजू व अब्दुल्ला यांना ताब्यात घेतले. बनावट ग्राहकांना अब्दुल्ला याच्या 8097234308 या मोबाईल क्र. सपंर्क साधून व्यवस्थापक अंकित पोदार याला 4500/ – रू दिले. त्या अनुषंगाने पोलीस पथकाने रंगेहात पकडले व त्यांच्या विरोधात रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरुद्ध दि. 20/11/2025 रोजी बी एन एस कलम 143 (3),3(5) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई ही सपोआ धर्मपाल बनसोडे AHUT यांच्या मार्गदर्शना खाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, सपोनि राजश्री शिंदे, पो. उप. नि. सरिता गुडे, पोलीस कर्मचारी अनिल मांडोळे, ठाकूर, चव्हाण,परासूर, ज्योती अडकमल, पवडे, अनिता डोके,चालक मोहिते यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ