spot_img

Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांची कामगिरी चोरी झालेले व घहाळ झालेले सुमारे 22 लाख 50 हजाराचा मुद्धेमाल केला परत

spot_img

नवी मुंबई – विजय गायकवाड

नवी मुंबईतील (Navi Mumbai) कोपरखैरणे (Koparkhairane) पोलीस ठाण्याच्या व विविध हद्धीतून चोरीस गेलेले व गहाळ झालेले असे सुमारे 22 लाख 50 हजार रुपयाचे 80 मोबाइल कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत दिले. या बाबत कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे उमेश गवळी यांनी प्रसारमाध्यमाना अशी माहिती दिली की, गेल्या काही दिवसा पासून कोपरखैरणे व नवी मुंबई परिसरातून मोबाईल चोरी व गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली CERE प्रणालीच्या माध्यमातून पोलीस पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन भारतातील विविध राज्यातून हस्तगत केलेले सुमारे 22 लाख 50 हजार रुपये किमतीचे 80 मोबाईल फोन नागरिकांना दि. 31 जानेवारी रोजी सुपूर्द करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सह आयुक्त संजय ऐनापुरे, रबाळे सह आयुक्त राहुल धस, यांच्या मार्गदर्शना खाली वपोनि उमेश गवळी,पो. उप. नि. गजानन टाकळे, पो.शि. म्हात्रे, राहुल मोरे, विक्रम ढाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ