नवी मुंबई, विजय गायकवाड
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,पोलीस उपायुक्त पंकज डहाणे (परिमंडळ-1) यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत विशेष कोंम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर मोहिमेत परिमंडळ-1 मधील 7 पोलीस स्टेशनमधील 04 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) व 184 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. हे कॉम्बिंग ऑपरेशन नोसिल नाका, अर्जुनवाडी, घनसोली साईनाथवाडी व रबाळे परिसरात राबविण्यात आले.
पोलीस आयुक्त व मा. पोलीस उपायुक्त यांच्या झिरो टॉलरन्स धोरणानुसार अमली पदार्थ विक्री व सेवन करणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, जुगार क्लब अशा अवैध धंद्यांवर एकाच वेळी मास रेड करून कठोर कारवाई करण्यात आली. यावेळी अवैध बांगलादेशी व नायजेरियन नागरिकांची तपासणी, फरारी व पाहिजे आरोपींचा शोध, हॉटेल व लॉजेस मधील संशयास्पद व्यक्तींची तपासणी, नाकाबंदी करून वाहन तपासणी तसेच वॉरंट बजावणी अशा विविध कारवाया करण्यात आल्या.
एक आरोपी कडून एक देशी कट्टा व 2 राऊंड जप्त करण्यात आले तसेच त्यांचेकडून ब्राउन शुगर च्या 100 चिट्ठ्या मिळून आल्या त्याच्यावर आर्म ऍक्ट व आमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंद्यांविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणानुसार पुढील काळातही अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत.




