Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेची विक्रमी झेप, मालमत्ता कर वसुलीत 876 कोटींचा टप्पा पार

spot_img

नवी मुंबई महानगरपालिकेने 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत अभूतपूर्व कामगिरी करत 876 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. स्थापनेपासून एका वर्षात मिळवलेली ही सर्वाधिक वसुली ठरली असून, एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महापालिकांपेक्षा नवी मुंबई महापालिका करवसुलीत पुढे राहिली आहे.

ही यशस्वी कामगिरी साध्य करण्यासाठी महापालिकेने पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीवर विशेष भर दिला. ऑनलाईन पेमेंटसारख्या सुलभ सुविधांमुळे एकूण वसुलीपैकी सुमारे 60 टक्के रक्कम नागरिकांनी डिजिटल माध्यमातून भरली. याशिवाय एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप संदेश, नोटिसा आणि प्रत्यक्ष संपर्काद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आला. तसेच सुट्ट्यांच्या दिवशीही कर संकलन केंद्रे सुरू ठेवून वसुलीला गती देण्यात आली.

थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी 10 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत अभय योजना राबवण्यात आली. या योजनेत एकरकमी थकबाकी भरल्यास विलंब शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि मोकळ्या जागांच्या मालकांनी या योजनेचा लाभ घेतल्याने वसुलीत मोठी वाढ झाली.

महापालिकेच्या सुयोग्य नियोजनामुळे आणि आधुनिक सुविधांमुळे यंदा मालमत्ता कर वसुलीत नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ