आजच नगरपरिषद व अन्य पंचायतीचा निकाल लागला असून शिवसेनेचा चांगला स्ट्राईक रेट जास्त आला आहे.लोक म्हणायचे की शिवसेना फक्त मुंबई, ठाणे व कल्याण पुरती आहे मात्र आता सर्व ज़िल्ह्यात शिवसेना वाढली आहे. आपल्याला लाडक्या बहिणींनी साथ दिली त्यांचे अभिनंदन त्यांच प्रमाणे भावाचे देखील अभिनंदन करतो ‘ये तो अभी झाकी है अभी पीक्चर बाकी है असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली त्यांच्या विचारना मूठ माती देण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही जागा दाखवली 2022 ला आम्ही बंड केले ते लोकांनी स्वीकारले आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला विधान सभेत साठ जागा मिळाल्या आम्ही आमच्याकडे डोळ्या समोर विकासाचा अजेंडा डोळ्या समोर ठेवून काम केले. त्यांचे फळ आम्हाला मिळत आहे. तिकडे काही लोकांना मळमळ, आणि काय काय होऊ लागले आहे त्यांना आता जमाल गोटा देण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) पालिकेवर आपल्याला भगवा फडकावयाचा आहे.
रात्र वैऱ्याची शिवसैनिकांनी गाफिल राहू नये.सावध राहिले पाहिजे. यावेळी शिंदे यांनी शेरो शायरीतुन ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.” जलने वाले जलते रहे, खिलनेवाले खिलते रहे गुलाब की तरह, ” आपसातील मतभेद दुर ठेवा हा माझा हा तुझा असा कार्यकर्त्यांचा भेदभाव करु नका आपल्याला नवी मुंबई पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. हे लक्षात घेऊन कामाला लागा असे प्रतिपादन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी रविवारी ऐरोली येथील लक्ष्मीनारायण सभागृहात शिवसेना कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान केले.या प्रसंगी व्यासपिठावर उपनेते विजय चौगुले, विजय नहाटा, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, माजी उप महापौर अशोक गावडे, रमाकांत म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, माजी नगरसेवक संजू वाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यावेळी आयोजकांनी व्यासपीठावर छ. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या तसबिरी ठेवल्या होत्या मात्र संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तसबीर नसल्याची बाब पत्रकारांनी माजी नगरसेवक संजू वाडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर आयोजकांनी दिलगिरी व्यक्त करून पुन्हा नव्याने सर्व तसबिरी व्यासपीठावर ठेवल्या.




