spot_img

Navi Mumbai : समविचारी पक्षाशी स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणुकीस सामोरे जाऊ – रामचंद्र दळवी

spot_img

नवी मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात काँग्रेसला दुर्लक्षित करून कोणताही पक्ष सत्तेवर आला नाही. आजही काँग्रेस पक्षाचे संघटन इथं मजबूत असून महाविकास आघाडीतील सहकार्यासह प्रहार आणि वंचित समविचारी पक्षाना सोबत घेऊन आगामी निवडणुकीस सामोरे जाऊ. स्थानिक पातळीवर निवडणुकीचे निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठनी आम्हास दिले असल्याचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष रामचंद्र (आबा ) दळवी यांनी बेलापूर (Belapur) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) समितीने आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी (Ramchandra Dalvi) यांची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने पक्षाची भूमिका सांगण्यासाठी बेलापूर येथील एलोरा कॅसलं सोसायटीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मुख्य समन्वयक संतोष शेट्टी, नवी मुंबई प्रभारी डॉ. मोनिका अग्रवाल, वरिष्ठ नेते रविंद्र सावंत, नवी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा उज्वला साळवे, दत्ता माने, प्रा. रत्नाकर कुदळे, रमेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना समन्व्यक संतोष शेट्टी यांनी सांगितले की, मागील सत्ताधारी राजकारण्यांनी नवी मुंबई महापालिकेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.नागरिकांना आरोग्य सेवा अपुरी मिळत आहे. फेरीवाले, झोपडपट्टी, बेरोजगार आदी च्या समस्या जैसे थे असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ