spot_img

Navi Mumbai : ऐरोली येथे तलावाची संरक्षण भिंत कोसळली

spot_img

विजय गायकवाड नवी मुंबई – ऐरोली

नवी मुंबई – ऐरोली येथील सेक्टर १ येथील गणपती तलावाची सभोवताली असणारी नवीन संरक्षण भिंत( wall Copauand) बांधण्याचे काम सुरू होते. या तलावाच्या शेजारी नागरीवस्ती असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने नवीन भिंत बांधण्याचे गरजेचे होते त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगर पालिकेकडून सुरक्षाभिंत बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली होती सदरची निविदा रिलायन्स या नामवंत कंपनीस मिळाले होते. संरक्षण भिंतीचे काम सुरु केल्याने या तलावातील गाळ उपासण्यात आलेला होता. मात्र पालिका आयुक्तानी निर्देश दिल्या प्रमाणे नवी मुंबई (Navi Mumbai) पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आल्याने काम बंद ठेवण्यात आले होते. निवडणूक प्रकिया पूर्ण झाल्याने काम पुन्हा सुरू करण्यात आले होते.

परंतु बुधवारी संध्याकाळी येथील रस्ता अचानक खचल्याने तलावाची सुरक्षणभिंत कोसळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी झाली नाही.मात्र येथील स्थानिकाच्या दुचाकी खड्ड्यात पडल्याने नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. या तलावा पासून अवघ्या १० फुटावर असलेल्या घरामधील राहिवश्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर कंत्राटदारास कामाचा अनुभव कमी असून, तलावातील गाळाचा मोठ्या प्रमाणात उपसा केला गेल्याने जमिन खचली असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत जी विभाग पालिका अभियंता विभागाशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ