spot_img

Navi Mumbai Crime : रिक्षा चोराला रबाळे पोलिसांनी केली अटक,3 रिक्षा जप्त

spot_img

नवी मुंबई, विजय गायकवाड

घणसोली परिसरातून रिक्षा चोरीला जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते.घणसोली येथील रिक्षा चालक
सुहास अरविंद कोटकर (४४ )यांची रिक्षा देखील काही दिवसांपूर्वी चोरीस गेली. यामुळे कोटकर यांनी रबाळे पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दिली होती.त्या अनुषंगाने रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, यांच्या मार्गदर्शना खाली पो. नि. (प्रशासन) बनसोडे, पो. नि. (गुन्हे) सचिन गवळी यांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दिपक खरात व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. पोलीस पथकाने तपासादरम्यान घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्याच प्रमाणे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सराईत आरोपी महेश शिवाजी गवळे (२०) याला चिंचपाडा, Rbale MIDC येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता आरोपीवर यापूर्वी देखील अनेक गुन्हांची नोंद असून त्याचा रिक्षा चोरीच्या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीकरिता अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिक्षा क्र. MH43 BF 2870, रिक्षा क्र. MH43 BF 8201 आणि रिक्षा क्र. MH43 BR 2313 असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.सदरचा तपास पथकात रबाळे पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक खरात, पो.हवा.दर्शन कटके, मयूर सोनवणे, गणेश वीर, धनाजी भांगरे, पो.शि.यादवराव घुले व मनोज देडे सहभागी होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ