spot_img

Navi Mumbai Crime : विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी केला पर्दाफाश !

spot_img

लाखोंचा चोरी गेलेला मुद्देमाल पोलीसांनी केला हस्तगत.

प्रतिनिधी विजय गायकवाड (नवी मुंबई)

नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोली येथे एका लग्नसोहळ्यात चोरीची धक्कादायक घटना घडली. वधूच्या आईच्या बॅगेतून तब्बल 10 लाख रुपयांचे सोने, रोख रक्कम आणि दोन आयफोन चोरीला गेले. रविवारी दि. 02/11/2025 रोजी सेक्टर 15 येथील लेवा पाटीदार समाज हॉलमध्ये लग्न सोहळा सुरू असताना दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास स्टेजवरच हा प्रकार घडला. त्यामुळे चालू लग्नात एकाच खळबळ माजली.सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

65 वर्षीय शकुंतला प्रसाद या अक्षय सोसायटी, सेक्टर 15, ऐरोली येथे राहतात. शकुंतला प्रसाद यांनी स्टेजवर ठेवलेली त्यांची बॅग गायब झाली. या बॅगेत सोन्याचे दागिने (सोन्याची चैन,सोन्याची कानातले) असे एकूण 92 ग्रॅम सोन्याचे दागिने ,दोन आयफोन आणि 2 लाख रुपये रोख रक्कम होती. ही रोख रक्कम केटररला पैसे देण्यासाठी होती. मात्र ती चोरीला गेली. गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत,पो. नि. सचिन गवळी(गुन्हे),पो. नि. श्याम बनसोडे यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि अविनाश पाळदे व त्यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली घटनास्थळाचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन संशयित इसम तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार दिसून आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, लग्न मंडपातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात एक संशयित व्यक्ती कैद झाला. हा व्यक्ती पाहुणा असल्याचे भासवून स्टेजजवळ फिरत होता. तोच व्यक्ती शकुंतला प्रसाद यांची बॅग घेऊन लग्न मंडपातून बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी चोरीला गेलेल्या आयफोनचे लोकेशन ट्रेस केले. एका आयफोनचे लोकेशन शहापूर, ठाणे जिल्ह्यापर्यंत दाखवत होते. त्यानंतर दोन्ही आयफोन बंद झाले.पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू ठेवला. गुप्त बतमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माहिती घेऊन पोलिसांचे पथक मध्यप्रदेशमधील कडिया सांशी गाव या ठिकाणी रवाना झाले होते. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने 5 दिवस तपास करून पोलिसांनी महिला आरोपीला अटक केली. अटक केलेल्या महिलेचे नाव अंजली प्रदीप दपानी (वय 28 वर्ष) असून ती मूळची मध्य प्रदेशची रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून तब्बल सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम व आयफोन असा एकूण 07,53,000/- रु किमतीचा चोरी गेलेला माल हस्तगत केला. व तक्रारदार शकुंतला प्रसाद यांच्याकडे सुपूर्त केला. मात्र या चोरीच्या घटनेतील मुख्य आरोपी अरुण उर्फ वरून उमेश बालेरिया, मानव सिसोदिया, प्रदीप सिसोदिया हे फरार असून यांचा तपास पोलिस करत आहेत. हे आरोपी मुळचे मध्य प्रदेशचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ