Navi Mumbai Crime : ऐरोलीत मध्यरात्री गोळीबार, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

spot_img

नवी मुंबईमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐरोली सेक्टर 1 मधील छत्रपती शिवाजी निवासी चाळ परिसरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने दोन तरुणांवर गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११.५० वाजता अमित मौर्य आणि संदीप गवस हे दोघे रस्त्यावर उभे असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोराने अचानक त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात चार राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी एक गोळी अमित मौर्य यांच्या मानेवर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने इंद्रावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले आहे

घटनास्थळी तपासादरम्यान पोलिसांना चार वापरलेल्या काडतुसांचे खोके सापडले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून येताना आणि गोळीबार करताना दिसत आहे. पोलिसांनी जखमी अमित मौर्य यांची चौकशी केली असता त्यांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले की, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे ऐरोली परिसरात सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ