spot_img

Navi Mumbai Crime। ऐरोलीत 15 वर्षांच्या मुलांचे अपहरण,लाखोंची खंडणी मागणाऱ्यांना अटक

spot_img

नवी मुंबई : विजय गायकवाड

ऐरोली (Airoli) सेक्टर 9 मधील दिवा गावात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलांचे अनोळखी इसमानी रविवारी संध्याकाळी 7 वाजता अपहरण केले होते. अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाच्या मोबाईल वरून त्याच्या वडिलांना फोन करून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली मात्र याची माहिती पालकांनी रबाळे पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज तपासून 4 आरोपीना 24 तासाच्या आत अटक केली. याबाबत गुन्हे कक्षेचे वपोनि तानाजी भगत यांनी प्रसारमाध्यमांना अशी माहिती दिली की, ऐरोली सेक्टर 9 येथे राहणारा क्रिश रवींद्र मढवी (15) याचे ऐरोली सेक्टर 9 येथील गरम मसाला हॉटेल जवळून 4 अनोळखी इसमांनी अपहरण केल्याची घटना घडली. अपहरण केलेल्या क्रिशच्या मोबाईल फोनवरून त्याच्या घरी फोन करून 20 लाखांची खंडणी मागितली यानंतर क्रिशचे काका मीनानाथ मढवी यांनी रबाळे पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची फिर्याद दिली. रबाळे पोलिसांनी दि.28 रोजी गुन्हा रं. क्र. BNS कलम 137 (2),308,(3) अन्वये गुन्हा दाखल केल्या नंतर नवी मुंबई पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता सेक्टर 9 येथील गरम मसाला हॉटेल येथे एका T परमिट कारमध्ये चार आज्ञातांसोबत जाताना दिसला, तसेच सदर कारच्या नंबर वरून कार चालकाकडे चौकशी केली असता, कार चालकाने 4 इसम व अपहरण केलेला क्रिश याला साई आराधना अपार्टमेंट, सदाशिव पाटील पार्किंग, राजाराम नगर, नांदिवली गाव येथे सोडल्याचे सांगितले. या इमारती मधील सर्व खोल्यांची पोलीस पथकाने झडती घेतली असता एका खोलीत चौघे अपहरणकर्ते व एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ क्रिशच्या आई वडिलांना बोलावून घेतले व त्यांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी 1) प्रदीप गयाराम जयस्वाल( वय 24), 2) विशाल राम बहादूर पासी (वय 19),3) चंदन विनोद मोर्या ( वय19), 4) सत्यम शिवानंद यादव (वय19) सर्व रा. साई आराधना सोसा. कल्याण मूळ गाव पोखलास, महू, उत्तरप्रदेश या सर्व आरोपीना दि. 29/12/2025 रोजी गुन्हे कक्षने अटक करून त्यांनामा. बेलापूर कोर्टात हजर केले असता त्यांना दि. 31/12/2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहा.पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे याच्या मार्गदर्शना खाली गुन्हे कक्ष -1 चे वपोनि तानाजी भगत, सपोनि निलेश बनकर, पोउपनि अभय काकड, पो. ना. अझहर मिर्झा, पो. शि. विशाल सावकार,पो. शि. भारत सातव व विश्वास भोईर यांनी कारवाई त सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ