spot_img

Natasa Stankovic Hardik Pandya : नताशाच्या ‘संस्कारांचे’ सोशल मीडियावर होतंय कौतुक!

spot_img

हार्दिकची गर्लफ्रेंड आणि मुलाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून अभिनेत्री माही विज भारावली

खेळ आणि ग्लॅमर विश्वात सध्या हार्दिक पांड्या, त्याची पूर्व पत्नी नताशा स्टॅनकोविक आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांची जोरदार चर्चा आहे. निमित्त ठरलं ते म्हणजे, हार्दिकची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेला त्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याच्यासोबत असलेली माहिका शर्मा. मैदानात हार्दिक चौफेर फटकेबाजी करत असताना, स्टँड्समध्ये बसलेली माहिका आणि छोटा अगस्त्य त्याला उत्साहाने दाद देत होते. या दृश्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे, ते म्हणजे नताशाने आपल्या मुलाला दिलेले उत्तम संस्कार.

टीव्ही अभिनेत्री माही विज हिने नताशाच्या या समजूतदारपणाचे जाहीर कौतुक केले आहे. स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माही म्हणाली की, “हे जग खरोखर सुंदर आहे, जिथे मुलाला तिरस्काराऐवजी प्रेम करायला शिकवले जात आहे.” नताशाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील तणाव बाजूला सारून मुलाला ज्या सकारात्मक वातावरणात वाढवले, त्याबद्दल तिने नताशाचे आभार मानले. हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला असला तरी, मुलाच्या भविष्यासाठी आणि आनंदासाठी ते दोघेही कटिबद्ध असल्याचे दिसते. नुकतीच हार्दिकने आपल्या लेकाला ३० कोटींची कार भेट दिल्याची चर्चाही रंगली होती, ज्यामुळे बाप-लेकाचं नातं अधिक घट्ट असल्याचं समोर आलं.

विशेष म्हणजे, ही पोस्ट शेअर करताना माही विजने तिच्या स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाचाही संदर्भ दिला. अभिनेता जय भानुशाली याच्याशी घटस्फोट झाल्यानंतरही, ते दोघे मिळून आपल्या लेकीचा, ताराचा सांभाळ करत आहेत. जेव्हा मोठे लोक आपले अहंकार बाजूला ठेवून मुलांच्या आनंदाला प्राधान्य देतात, तेव्हाच अशा प्रकारची सकारात्मक उदाहरणे समाजासमोर येतात, असा संदेश या घटनेतून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ