Nashik News : रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीत नाराजी; पदावरून हटवण्याची मागणी

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत रूपाली चाकणकर यांच्या विरोधात असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. पक्षातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवत चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, चाकणकर यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का बसत आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात काम केल्यास पक्षाची प्रतिमा अधिक खराब होण्याची भीती व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर, केवळ पदावरून हटवण्याचीच नव्हे तर पक्षातूनही त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे. या घडामोडींमुळे पक्षात नव्या चर्चांना उधाण आले असून, महिला संघटनेतील नेतृत्व आणि पुढील भूमिका यावर आता लक्ष केंद्रीत झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ