spot_img

Nashik Crime : ठाणे-नाशिक एग स्मगलिंग रॅकेट वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना

spot_img

ठाणे जिल्ह्यातून उघडकीस आलेल्या महिलांच्या स्त्री-बीज (Egg) तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिकच्या एका डेंटिस्टला अटक केली आहे. डॉ. अमोल पाटील असे या आरोपीचे नाव असून, तो नाशिकमधील मुंबई नाका परिसरात आपल्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या ‘मालती आयव्हीएफ सेंटर’च्या माध्यमातून हे बेकायदेशीर रॅकेट चालवत होता. तपासात असे समोर आले आहे की, या सेंटरचा वापर केवळ उपचारांसाठी नसून बनावट सरोगसी करार आणि महिलांच्या अंड्यांची तस्करी करण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी या कारवाईत १५ लाख रुपयांची औषधे आणि इंजेक्शन्स जप्त केली असून, आरोपीला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमुळे आता या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सहा झाली आहे.

या रॅकेटचे स्वरूप अत्यंत भीषण असून, गरिबीचा फायदा घेत गरजू महिलांना अवघ्या २५ ते ३० हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांचे शोषण केले जात होते. कायदेशीर नियमांना बगल देण्यासाठी ही टोळी बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रांचा वापर करायची, ज्यामुळे एकाच महिलेला वेगवेगळ्या नावांनी अनेकवेळा ‘डोनर’ म्हणून दाखवले जात असे. प्राथमिक अंदाजानुसार, या नेटवर्कद्वारे ५०० हून अधिक महिलांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या मोबाईल फोन्समध्ये अनेक महिलांचे फोटो, बनावट प्रतिज्ञापत्रे आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स सापडले आहेत. सध्या उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतील इतर आयव्हीएफ केंद्रांचीही कसून चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ