Nashik Car Accident : दिंडोरीत भीषण दुर्घटना; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

spot_img

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. रात्री उशिरा कार विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीच्या कठड्याला धडकली आणि थेट पाण्यात पडली. मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. सुरुवातीला काही काळ गाडी पाण्यावर तरंगत होती, मात्र काचा बंद असल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळातच गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली.

घटनेनंतर सुमारे २० मिनिटांनी अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेत विहिरीतील पाणी काढण्याचे प्रयत्न केले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गाडी बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये आठ जण आढळले, तर एक लहान मुलगी विहिरीत सापडली. सर्वांना बाहेर काढल्यानंतर नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच आमदार नरहरी झिरवाळ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या विहिरीबाबत पूर्वी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ