Narhari Zirwal : ‘त्या’ आक्षेपार्ह व्हीडीओवर झिरवळांनी केली निष्पक्ष चौकशीची मागणी

spot_img

नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. या प्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून, एका ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, या प्रकरणात संबंधित व्यक्तीकडून नोकरी लावून देण्याची मागणी करत, अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ एडिट करून प्रसारित केल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, झिरवळ यांनी या सर्व आरोपांवर आपली बाजू स्पष्ट करत, आपण निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलिसांना पत्र दिल्याची माहिती दिली आहे.

तसेच, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असल्याचेही समोर आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले असले, तरी पुढील पक्ष बैठकीत उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, पुढील काळात या प्रकरणात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ