spot_img

Nalasopara News : राज अन् उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह व्हिडीओ करणाऱ्यांना मनसैनिकांनी दिला चोप

spot_img

उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना एकेरी नावाने बोलून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांची बदनामी करून अत्यंत वाईट शब्दात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. नालासोपारा इथे सोशल मीडियावर राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडून बेदम चोप दिला. त्याची अर्धनग्न अवस्थेत नालासोपारा परिसरात सुमारे दीड किलोमीटरपर्यंत धिंड काढली. या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूरज महेंद्र शिर्के नावाच्या तरुणाने गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे मनसे आणि शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट होती.

मनसे (MNS) चे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हा तरुण नालासोपारा येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्याला गाठले आणि तिथेच त्याचा पद्धतशीर चोप दिला. इतक्यावरच न थांबता, कार्यकर्त्यांनी त्याला अर्धनग्न करून रस्त्यावरून त्याची धिंड काढली. या घटनेनंतर मनसे पदाधिकारी किरण नकाशे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, “राजसाहेब आणि उद्धव साहेबांबद्दल अश्लील भाषेत लिहिणाऱ्या या विकृत तरुणाच्या आम्ही शोधात होतो. तो मराठी असो वा अमराठी, आमच्या दैवतांबद्दल बोलताना जर कोणी पातळी ओलांडली, तर त्याची अशीच मिरवणूक निघणार. याला हीच भाषा समजते.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ