स्फोटानंतर आग लागल्याने बचावकार्य वेगात.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगावजवळ असलेल्या बारूद व त्यापासून डेटोनेटर तसेच इतर स्फोटके तयार करणाऱ्या एका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे १५ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोट इतका तीव्र होता की परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेनंतर कारखान्यात आगही लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. जखमी कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव आणि नियंत्रणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.




