spot_img

Municipal Election : कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाची वाढली ताकद, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

spot_img

राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena Uddhav Thackeray) ठाकरे गटाला काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याच्या चर्चा सुरू होत्या, अशातच आता डोंबिवलीत ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे पाहायला मिळतय.

कल्याण-डोंबिवलीमध्ये सध्या इतर शहरांपेक्षा निवडणुकीचे वारे जरा जास्त वेगाने वाहत आहेत. एकीकडे शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये उमेदवारांची रस्सीखेच सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शांतीत क्रांती करण्याच्या वाटेवर आहे. नुकताच डोंबिवलीमध्ये (Dombivli) शिवसेना उद्धव पक्षामध्ये वेगवेगळ्या पक्षातील 150 हुन अधिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. वैशाली किरण म्हात्रे (Vaishali Mhatre) यांनी या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे नेतृत्व करत महिला व तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी कल्याणचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, उपशहरप्रमुख शाम चौगले, विभागप्रमुख राजेंद्र सावंत, आदित्य पाटील, विलास भोईर हे उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ