spot_img

Municipal Election 2026 : राजकारणातील निष्ठेला तडा! ठाकरे युतीनंतर अवघ्या 24 तासांत मनसेला मोठा धक्का

spot_img

राज ठाकरे यांचा विश्वासू नेता दिनकर पाटील यांची अचानक भाजपमध्ये उडी, नाशिकच्या राजकारणात खळबळ

राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे वाक्य पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ऐतिहासिक युतीच्या बातमीने बुधवारी अनेक नेते आणि कार्यकर्ते आनंदात होते, पेढे वाटले जात होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी एक असा राजकीय भूकंप झाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला.

मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, याच नेत्याने ठाकरे बंधूंच्या युतीचा आनंद व्यक्त केला होता. राज ठाकरेंनी ज्यांना पक्षात मान-सन्मान, अधिकार आणि उमेदवारी दिली, त्यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडल्याने मनसेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दिनकर पाटील यांचा पक्षांतराचा इतिहास नवीन नाही. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजप सोडून मनसेत प्रवेश केला होता. त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्याआधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.

नाशिकच्या सातपूर परिसरात दिनकर पाटील यांचे चांगले वर्चस्व आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी आणि मुलाला उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मनसेकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. मात्र, सर्व समीकरणं बाजूला सारत त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला.

मनसे सोडण्यामागचं कारण विचारलं असता, दिनकर पाटील यांनी नाराजी नाकारली. “मी कुणावरही नाराज नाही. राज साहेबांवरही नाही. मी केवळ विकासाच्या हेतूने भाजपमध्ये प्रवेश करत आहे,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ