spot_img

Municipal Corporation Election : गौतमी पाटीलच्या अदांनी सभेला केली गर्दी,चंद्रपुरात केला कॉँग्रेसचा प्रचार

spot_img

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांच्या भाषणांपेक्षा आता सिनेसृष्टीतील ताऱ्यांचीच जास्त चर्चा रंगत आहे. मतदारांच्या मनाचा कौल मिळवण्यासाठी उमेदवारांनी आता चक्क स्टार कार्ड खेळायला सुरुवात केली आहे. कुठे ‘सैराट’ फेम परश्याची क्रेझ आहे, तर कुठे गौतमी पाटील (Gautami Patil) च्या अदांनी सभेला गर्दी खेचली जात आहे. अशातच निवडणुकीचा हा धुरळा आता खऱ्या अर्थाने ग्लॅमरस झाला आहे.

चंद्रपूर (Chandrapur) महानगरपालिकेच्या प्रचारात तर काँग्रेसने थेट गौतमी पाटीललाच मैदानात उतरवून विरोधकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. काँग्रेसच्या भव्य प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच गौतमीची उपस्थिती सर्वांचे आकर्षण ठरली. यावेळी गौतमीने प्रचार सभेत मतदारांना संबोधित केलं. गौतमी म्हणाली, “महिलांचा हा जोश मला खूप आवडला. मी नेहमीच महिलांसाठी उभी असते. पण आज जो जोश मी पाहिला, असाच जोश कायम ठेवायचा आहे. आपला काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी करायचा आहे.”

चंद्रपूरच्या या सभेत केवळ राजकीय घोषणाच नाही, तर गौतमीला पाहण्यासाठी आलेल्या हजारो लोकांच्या गर्दीने सभास्थळ अपूरं पडलं. गौतमीच्या उपस्थितीमुळे या सभेची चर्चा जिल्हाभर रंगली असून, काँग्रेसने या माध्यमातून तरुणांची मोठी फळी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ