spot_img

Mumbai Pune High Speed Rail : मुंबई–पुणे बुलेट ट्रेनला हिरवा कंदील, अवघ्या 48 मिनिटांत दोन शहरांचा प्रवास शक्य

spot_img

केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा; हाय-स्पीड रेलमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती

केंद्रीय अर्थसंकल्प 2025–26 मध्ये महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या दोन प्रमुख शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून, त्यामुळे सध्या सुमारे चार तास लागणारा रेल्वे प्रवास थेट अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नव्या हाय-स्पीड रेल कॉरिडोर्समध्ये मुंबई–पुणे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या कॉरिडोअरवर 300 ते 320 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई–पुणे मार्गासाठी ही योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज हजारो प्रवासी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कामांसाठी ये-जा करतात. अनेक जण रोज अप-डाऊन करतात. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर सध्या बोरीवली ते चर्चगेट इतका वेळ लागतो, तेवढ्याच वेळेत मुंबईहून थेट पुण्यात पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

या हाय-स्पीड रेल प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. विशेषतः प्रस्तावित मुंबई–पुणे–हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरमुळे आयटी, उद्योग, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला थेट चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही देशातील महत्त्वाची आर्थिक आणि तांत्रिक केंद्रे आहेत. या शहरांमधील जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह कनेक्टिविटीमुळे नवीन गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला वेग मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रस्ते आणि हवाई वाहतुकीवरील वाढता ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

सध्या मुंबई–पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. मध्य रेल्वेकडून दररोज पहाटे पाच विशेष गाड्या चालवण्यात येतात, ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. मात्र तरीही अनेकदा तिकिटे कन्फर्म होणे कठीण ठरते. मोठ्या प्रमाणात प्रवासी मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून खासगी वाहनं, बस आणि शेअरिंग कॅब्सद्वारे प्रवास करतात. उपलब्ध माहितीनुसार, या एक्सप्रेसवेवर दररोज सरासरी 43 हजार वाहनांची ये-जा होते.

बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यासोबतच, मुंबई–पुणे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार असल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ